Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाशरद पवारांनी घेतली कोरोना लस, आता ३० मिनटं निरीक्षणाखाली

शरद पवारांनी घेतली कोरोना लस, आता ३० मिनटं निरीक्षणाखाली

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लस घेतली आहे. सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस घेतल्याी माहिती मिळाली आहे. लस घेतल्यावर त्यांना ३० मिनटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

लस घेण्यासाठी शरद पवार काहीवेळापूर्वीच मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले. यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या. तसंच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!