बीड (रिपोर्टर)ः- वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे आईसह मुलास बेदमपणे मारहाण करण्यात आली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अंबाजोगाई येथील बांधकाम विभागातील इंजिनीअरला एकाने जिवे मारण्याची धमकी दिली.
छाया धनराज नागरगोजे रा.चिंचाळा ता.वडवणी या महिलेने गेल्या चार महिन्यापुर्वी आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये संबधीताविरोधात गुन्हा दाखल होवून त्यांना सहा ऑक्टोंबरला जामीन झाली होती. या आत्महत्येचा कारणावरुन मयत महिलेचा पती धनराज शेषेराव नागरगोजे व सासु निलावती शेषेराव नागरगोजे या दोघांना अशोक आंधळे, कल्याण आंधळे सह आदिंनी मारहाण केली. जखमीवर जिल्हा रुग्णालयावर उपचार सुरू आहे. तर अंबाजोगाई येथील बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता सय्यद मुजाहीद लतीफ यांना अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथील आत्माराम गित्ते यांने जिवे मारण्याची धमकी दिली. मोज पुस्तीकेवरुन हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सय्यद यांच्या फिर्यादीवरुन गित्ते याच्याविरोधात कलम 186, 504, 506,भादवी नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.