बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात काल आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सुनेविरुद्ध कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील बलभीम कॉलनी जवळ राहणार्या भास्करराव अंबादास वडमारे या ६१ वर्षीय वृद्धाने सुनेच्या त्रासाला कंटाळून इमामपूर रोडवरील एका हिवराच्या झाडाला २४ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी ‘मी सुनेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशी सुसाईड नोट आत्महत्येपुर्वी मयताने लिहून ठेवली होती. काल मयत भास्करराव वडमारे यांचा मुलगा अमोल यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात मयताच्या सुनेवर कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.