राज्यातल्या ग्राम पंचायतचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 18 डिसेंबर ला मतदान, 20 ला मतमोजणी जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीसाठी होणार निवडणुका
बीड (रिपोर्टर) ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या दरम्यान मुदत संपणार्या ग्राम पंचायतच्या निवडणुका निवडणूक निर्णय अधिकार्यांना आज जाहीर केल्या. 18.12.2022 रोजी मतदान होणार आहे तर 20.12.2022 ला मतमोजणी होणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून या निवडणुकीबाबत चर्चा रंगत होत्या. गावपातळीवरचे पुढारी ग्राम पंचायत निवडणुका कधी घोषित होतात याकडे लक्ष ठेऊन होते. निवडणूक विभागाने ग्राम पंचायत निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस 18.11.2022 रोजी जाहीर करावी, नामनिर्देशन पत्रे मागवण्याचा व सादर करण्याचा दि.28.11.2022 ते 2.12.2022 सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनंक व वेळ 5.12.2022 सकाळी 11 पासून छाननीपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 7.12.2022 दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 7.12.2022 दुपारी 3 वाजता व नंतर.18.12.2022 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते 5.30 वाजेपर्यंत मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा.गडचिरोली, गोंदीया जिल्ह्याकरीता सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी 20.12.2022 रोजी होणार आहे. दरम्यान निवडणुका जाहीर होताच राजकीय पुढारी गावपातळीवर कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसापासून ग्रा.पं.निवडणुकीची चर्चा सुरू होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता गावपुढारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. एकुणच राज्यभरामध्ये मुदत संपलेल्या ग्रा.पं.च्या या निवडणुका होत आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 83, आषटी 109, बीड 132, धारूर 31, गेवराई 76, केज 66, माजलगाव 44, परळी 80, पाटोदा 34, शिरूरकासार 24, वडवणी 25, या तालुक्यातल्या निवडणुका होणार आहेत.