Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडवर्षभरात ३५ ग्रामसेवक निलंबीत

वर्षभरात ३५ ग्रामसेवक निलंबीत

बीड (रिपोर्टर):- वित्त आयोगात सरपंचाच्या संगनमताने घोटाळा करणे, रोजगार हमीची कामे कागदावर करणे, प्रशासकीय कामात अनियमीतता दाखवणे या व इतर कारणामुळे वर्षभरात तब्बल ३५ ग्रामसेवक जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबीत केलेले आहे. त्यामुळे ग्रामसेवकाच्या संघटनेने कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्हासह प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र या दबावाला बळी न पडता प्रत्येक ग्रामसेवकाने ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक दिवशी उपस्थित राहून ईलेक्ट्रॉनिक हजेरी देण्याचे बंधन कारक करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात ग्रामसेवकावर इतकी मोठी कार्यवाही कधीच करण्यात आली नव्हती. शिक्षकाप्रमाणे स्वत:ला नेते समजणारे अनेक ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या आवारात फिरतांना दिसून येतात. आठ दिवसातून एक दिवस ग्रामपंचायतमध्ये हजेरी लावणे, जी महत्त्वाची कामे असतात त्या कामासाठी सरपंच किंवा ग्रामपंचायतच्या इतर कर्मचार्‍यांना तालुक्याच्या ठिकाणी बोलून घेणे, अशा प्रकारचे कामे हे ग्रामसेवक करतात. चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेमध्ये अनेक ग्रामसेवकांनी सरपंचाच्या संगनमताने घोटाळे केले आहे. ज्यांनी घोटाळे केले त्यांच्या चौकाश्या केल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कायर्कारी अधिकारी गिरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार यांनी तब्बल वर्षभरामध्ये ३५ ग्रामसेवकाला निलंबीत केले आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामसेवक कधीच निलंबीत झाले नव्हते. त्यात भरीस भर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार यांनी एका ऍपद्वारे प्रत्येक ग्रामसेवकाला ग्रामपंचायतमध्ये हजेरी लावून काम करणे बंधनकारक केले. त्यामुळे सगळ्या ग्रामसेवकांनी सीईओ कुंभार यांच्या या आदेशाला तिव्र विरोध केला. त्यामुळे दोषी ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात कोणताच कसूर कुंभार यांनी ठेवलेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!