ऑनलाईन रिपोर्टर –
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणी ठाणे कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर आव्हाडांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना माॅल प्रकरणी अटक आणि जामीन मिळाला होता. त्यानंतर कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर गर्दी सारून पुढे जाताना महिलेला त्यांनी बाजूला केले होते. या महिलनेने आपला विनयभंग झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला. त्यानंतर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.
न्यायालयाकडून दिलासा
मुंब्रा येथे रविवारी (ता. 13) रात्री कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली असून आव्हाडांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला हा त्यांना दिलासा मानला जात आहे.
गुन्हा माझ्या काळजाला लागला
आव्हाड म्हणाले, विनयभंगाचा गुन्हा माझ्या हृदयात लागला. पूर्ण व्हिडीओ बघितल्यानंतर आता माझ्या लक्षात येते की, महिला समोरून चालत येते तिच्या मनात प्लॅन असावा. मी समोर आलो तेव्हा तिला मी हाताने बाजूला सरकवले. त्यांना मी स्वःत बाजूला केले नसते तर त्या अंगावरच आल्या असत्या. मला देवाने बुद्धी दिली की, मी त्यांना बाजूला सारले, अन्यथा माझ्यावर यापेक्षा मोठा आरोप लावला.
पोलिस सांगतात वरून दबाव
आव्हाड म्हणाले, मला परवा अटक झाली. त्यावर कोर्टाने निकाल देताना अटकेची प्रक्रीया चुकली हे कोर्ट स्वःत म्हणत आहे. याची काॅपीही माझ्याकडे आहे. विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यापूर्वी पोलिसांनी स्वःत विचार करायला हवा. मी काय बोललो हे रेकार्डही झाले. त्या महिलेला मी एवढ्या गर्दीत कशाला जाता हे बोलले. वरुन दबाव आहे हे हवालदारापासून वरिष्ठ अधिकारी सांगतात.