गेवराई (रिपोर्टर) एफआरपी कराराचं करायचं काय, काली मुंडकं वर पाय’ अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी गेवराई बायपासवर ऊस घेऊन येणार्या ट्रक आणि ट्रॅक्टरला अडवून त्यांच्या चाकांची हवा सोडत एकरकमी एफआरपी-साठी आंदोलन केले. यामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत अधिक असे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज एकरकमी एफआरपीसाठी धुळे-सोलापूर रोडवर गेवराई बायपास येथे आंदोलन करण्यात आले. एफआरपीचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत स्वाभिमानीचे कार्यकर्ते महामार्गावर आले. महामार्गावरून ऊस वाहतूक करणार्या ट्रक-ट्रॅक्टरला अडवून त्यांच्या चाकांची हवा सोडून दिली. त्यामुळे ऊस घेऊन येणारे अनेक ट्रॅक्टर आणि ट्रक महामार्गावर अडकून पडले. या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, अध्यक्ष अशोक भोसले, राहुल तेलुरे, विलास खिसाडे, बळीराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.