बीड (रिपोर्टर) आज शहरातील जुना मोंढा रोड (शिवशारदा शो रूम ते अमर धाम) या रस्त्याच्या खड्डे बुजविण्याचे काम नागरिकांच्या मागणीवरून सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह सहकार्यांसमवेत भेट देवून व्यापारी व परिसरातील नागरिकांशी संवाद साधत रस्त्याबाबत चर्चा केली. सदरील रस्ता सिमेंट रोड होणार असून प्रशासकीय पातळीवरील काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे. परंतु येत्या महिनाभरात दर्जेदार पद्धतीने सिमेंट रस्ता होणार असल्याची माहिती युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. जुना मोंढा रोडवर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने येथे सिमेंट रस्त्याची आवश्यकता होती. सदरील रस्त्याचा शासन दरबारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे सदरील कामास विलंब होत होता. पण आता महिनाभरात सिमेंट रोडचे काम सुरू होईल अशी माहिती युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली,आज मोंढा भागात जाऊन येथील पहाणी करत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले,वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून सध्या दुरुस्ती होत असून हा रस्ता सिमेंट रस्ता होणार आहे
यावेळी न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या सह नगरसेवक शुभम धुत, इकबाल शेख,पत्रकार भागवत तावरे, नितिन साखरे, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, उद्योजक राजेंद्र मुनोत, कैलास लगड, योगेश अंधुरे, अमर विद्यागर, सूर्यकांत महाजन, किरण बेदरे, शुभम कातांगळे, संभाजी काळे, समीर तांबोळी, मनोज अग्रवाल, करण लोढा, ईश्वर धनवे, फामजी पारीख, प्रवीण सुरवसे, वैभव जाधव, संतोष अंधारे, अभिजित आव्हाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.