Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम केज शहरात विनापरवाना दारूची विक्री वाढली दारू पिऊन मद्यपी घालू लागले गोंधळ

केज शहरात विनापरवाना दारूची विक्री वाढली दारू पिऊन मद्यपी घालू लागले गोंधळ


केज (रिपोर्टर):- केज शहरासह ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होऊ लागली. अवैध दारू विकणार्‍यांविरोधात पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नसल्यामुळेच दारू विक्रीत वाढ झाली. मद्यपी दारू पिऊन रस्त्यावर व गल्ली बोळात गोंधळ घालू लागल्याने या मद्यपींना नागरिक त्रस्त झाले आहेत.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई केली जात नाही. अनेक ठिकाणी दारूची विक्री होऊ लागली आहे. कुठेही दारू मिळत असल्याने मद्यपी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालताना दिसून येत आहेत. शहरातील कानडी रोड, मंगळवार पेठ, बसस्थानक यासह अन्य परिसरात मद्यपींनी गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बसस्थानकात तर मद्यपी कुठेही झोपत असल्याने याचा त्रास प्रवासी महिलांना सहन करावा लागत आहे. दरम्यान मद्यपींविरोदात कारवाई करून अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांविरोधातही ठोस कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....