खा.कुमार केतकरसह आदिंची उपस्थिती
राज्यभरातून दोन हजारापेक्षा जास्त पत्रकारांची उपस्थिती
पुणे (रिपोर्टर) राज्यातील पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे. पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असल्याची खंत व्यक्त करत कोव्हीडमध्ये मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटूंबांना 50 लाखाची मदत मिळण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून सर्व ज्येष्ट पत्रकार यांना पेन्शन मिळावी. पेन्शनच्या ज्या काही किचकट अटी आहेत त्या रद्द कराव्यात. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
पिंपरी चिंचवड येथील कै.शंकरराव गावडे सभागृह थेरगांव येथे दोन दिवशीय मराठी पत्रकार परिषेदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन आज पासुन सुरुवात झाली आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी रामदास आठवले बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार कुमार केतकर,एस.एम.देशमुख, आयुक्त शेखर सिंह,बाळासाहेब ढसाळ, किरण नाईक, शरद पाबळे सर, अनिल गुलगुडे, सुनिल लोणकर, नाना कांबळे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते या अधिवेशाना दरम्यान आठवले पुढे बोलताना म्हणाले कि, कोरोनाच्या काळात प्रशासना सोबत पत्रकारांनी देखील योगदान दिले आहे.यात कर्तव्य बजावत आसताना कोरोनाची लागण होऊन यात तब्बल १५६ पत्रकाराचे देखील मृत्यु झाले आहेत.यांना देखील प्रशासना सोबत मयत पत्रकारांना देखील ५० लाखाची शासकिय मदत मिळावी तसेच बातमी विरोधी केली तर त्यांच्यावर हल्ले होत आहेत.हे हल्ले थांबवणे गरजेचे आहे.त्याच बरोबर जास्तीत जास्त पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी पुढाकार घेणार आसून लवकरच या बाबत पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.या अधिवेशनला वडवणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव जेधे, सचिव अविनाश मुजमुले, भैय्यासाहेब तांगडे, ॲड.ज्ञानेश्वर लंगे, रामेश्वर गोंडे, सतिश मुजमुले सह आदि पत्रकारासह राज्यातील पत्रकार देखील मोठ्या संख्येनी उपस्थित होते.