Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम पोलीस पेट्रोलिंगच्या गाडीला अपघात तीन कर्मचार्‍यांसह अन्य चार जण जखमी

पोलीस पेट्रोलिंगच्या गाडीला अपघात तीन कर्मचार्‍यांसह अन्य चार जण जखमी


उखंडा तलावाजवळ घडली घटना
शिवसैनिकांनी जखमींना केले रुग्णालयात दाखल

बीड (रिपोर्टर):- पोलीस कर्मचार्‍याची गाडी व अन्य एका दुसर्‍या गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन कर्मचार्‍यांसह दुसर्‍या गाडीतील चौघे जण जखमी झाले. ही घटना उखंड्याच्या तलावाजवळ घडली. घटनेची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांना झाल्यानंतर त्यांनी व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना बीडच्या रुग्णालयात दाखल केले.
बीड येथील एपीआय अशोक धांडे व त्यांचे सहकारी रात्री पेट्रोलिंग करण्यासाठी उखंडा मार्गे जात होते. उखंड्याच्या तलावाजवळ त्यांची स्कॉर्पिओ (एम.एच. २३ एफ. ०९००) व मुंबईहून बीडकडे येणार्‍या दुसरी स्कॉर्पिओ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एपीआय अशोक धांडे (वय ५७), पो.हे.कॉ. राजेंद्र शिंदे (वय ५५), पोलिस चालक प्रताप घोडके यांच्यासह उमा मोरे (वय ४०), उद्धव लक्ष्मण मोरे (वय ५०), तेजस मोरे (वय १५), आनंद मोरे (वय २५) हे जखमी झाले. या अपघाताची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी जयंत वाघ, शिवराज धांडे, हेमंत वाघ, पंकज धांडे, श्याम धांडे, अजिंक्य धांडे, गणेश झिंगुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, डॉ. सचिन देशमुख, डॉ. माजेद व इतर कर्मचार्‍यांनी सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार केले.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....