Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड भाजीपाला, दुधाचं करायचं काय? शेतकर्‍यांचे नुकसान, बेरोजगारी वाढली

भाजीपाला, दुधाचं करायचं काय? शेतकर्‍यांचे नुकसान, बेरोजगारी वाढली

बीड- कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु झाला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे खरं असलं तरी आता पुर्णंता: लॉकडाऊन करणं हा काही उपाय होवू शकत नाही. आपल्या आरोग्याची काळजी ज्याने-त्याने घेवून योग्य ते नियम पाळायला हवेत. कोरोनाने व्यवसायीकांचे आधीच कंबरडे मोडले. त्यात बीड जिल्हयात हॉटेल, टपर्‍या, बिअरबार पुर्णंत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र काल उशिरा यात काही प्रमाणात बदल करण्यात आला. बदल केला असला तरी यामुळे हॉटेल व्यवसायीक, कामगाराचं मोठं नुकसान होतच आहे. रोजगार नाही, त्यात हॉटेल ५० टक्के शमतेने सुरु असले तरी बेरोजगारीत भरच पडत आहे. कोरोनामुळे शेतकर्‍यांना जबरदस्त फटका बसला. शेतकरी हॉटेलला दुध देत होते. आता शेतकर्‍यांचे दुध शिल्लक राहू लागले. शिल्लक दुधाचं करायचं काय हा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला? बाजार बंद असल्याने भाजीपाला, फळांचे नुकसान होवू लागले. गेल्या वर्षी शेतकर्‍यांची कुपाट लागली. पुन्हा यावर्षीही तिच परस्थिती उदभवती की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
कोरोनाला येवून एक वर्ष झाले. कोरोनाचा पहिला रुग्ण राज्यात ९ मार्च रोजी सापडला होता. गत वर्ष असचं लॉकडाऊनमध्ये गेलं. कोरोनाच्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर लोकांनी नुकसान सहन करुन बंद पाळला. माणसांच्या आरोग्याचा प्रश्‍न महत्वाचा होता. गेल्या वर्षी मार्च मध्ये जी परस्थिती होती तीच परस्थिती यावर्षी ही उदभवू लागली. कोरोनाचे राज्यात रुग्ण वाढू लागले. बीड जिल्हयात दोनशे पेक्षा जास्त रुग्ण रोज निघू लागले. रुग्णांची वाढती संख्या पाहता. जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील सर्व बाजार बंद केले. तसेच जिल्हयातील हॉटेल, टपर्‍या, बिअरबार पुर्णंता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र इतर व्यवसायीकांना सुट देत, हॉटेल, टपर्‍या, बार पुर्णंत बंद करण्यात आले होते. त्यामुळे संबंधीत व्यवसायीक आणि त्या ठिकाणाच्या कामगारांना भीक मागण्याची वेळ आली होती. आधीच रोजगार नाही. त्यात पुन्हा बंदचा निर्णय त्यामुळे व्यवसायीक आणि कामगारांवर उपासमारीची दुर्दवी वेळ आल्याने त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केल्याने काल उशिरा जिल्हाधिकार्‍यांनी निर्णयात बदल करुन काही प्रमाणात सुट देण्यात आली.कोरोनाच्या नियमाबाबत कठोर नियमावाली केली पाहिजे. त्यात काही शंका नाही, पण व्यवसाय बंद करणं आज तरी परवडणारं नाही. लोक प्रचंड प्रमाणात परेशान आहेत. अशा परस्थितीत व्यवसाय बंद करणं म्हणजे लोकांच्या मानसीकतेला आधीकच तणावात घेवून जाण्यासारखं आहे. हॉटेल,बाजार, याच्याशी शेतकर्‍यांचा तितकाच संबंध आहे. जिल्हाभरातील हॉटेलमध्ये रोज लाखो लिटर दुध लागते. हॉटेल बंद असल्यामुळे शेतकर्‍यांचे दुध शिल्लक राहू लागले. शिल्लक राहिलेल्या दुधाचं करायचं काय हा त्यांच्या समोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हयातील आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला, फळे विकण्यास अडचण निर्माण झाली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात शेतकर्‍यांचा मोठा तोटा झाला. यावर्षी ही असचं होत की काय अशी भीती शेतकर्‍यांना सतावू लागली.
पिके शेतात सडली होती
काहींनी फुकट वाटली

बीड जिल्हयासह मराठवाड्यात उन्हाळी पिके मोठया प्रमाणात घेतली जातात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाची भीती पहता सर्वांनी लॉकडाऊन स्विकारलं. लॉकडाऊन असल्यामुळे टरबूज, खरबुज, द्राक्षे, काकडी, भाजीपाला, इत्यादी पिकांचे नुकसान झाले. काही शेतकर्‍यांचा माल शेतातच सडला. काहींनी कवडीभावाने विकाला तर काहींनी फुकट वाटला. शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यावर्षी जिल्हयात उन्हाळी पिकांची लागवड मोठया प्रमाणात झालेली आहे. यंदाचा शेती माल कसा विकायचा असा प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावू लागला. भाजीपाल्यांचे आणि फळांचे भाव सध्या कोलमडले आहेत. ज्यांच्या द्राक्ष, टरबूज, खरबूज, केळी, मोसंबीच्या बागा आहेत, ते शेतकरी चिंताग्रस्त दिसू लागले.

आवाज उठवला
शेतकरी, छोटे व्यवसायीक आज संकटात असतांनाच बीड जिल्हयात हॉटेल,बार, टपर्‍या बंद करण्यात आल्या होत्या. याबाबत आवाज उठवण्याचं काम अनेकांनी केलं आहे. कुणी तरी आवाज उठवला तरच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाला वाचा फुटू शकते. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, वंचीतचे अशोक हिंगे, ऍड. सुभाष राऊत,बबन वडमारे, आम आदमीचे येडे, मोहन जाधव, गुंदेकर इत्यादींनी आवाज उठवला. जिल्हाधिकार्‍याकडे निवेदन देवून हॉटेल मालक, शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न मांडले होते.

५० टक्के दिली सुट
हॉटेल, बिअरबार, टपर्‍या बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. यावर कित्येक लोक जगतात, त्यांचे कुटूंब त्यावर अवलंबून आहेत. हॉटेल उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, जनरेटा पाहता परस्थितीचा विचार करुन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हॉटेल व्यवसायीकांना ५० टक्के सुट देण्यात आलेली आहे. यामुळे संबंधीतांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....