9 ते 13 डिसेंबर मध्ये भरणार कृषी प्रदर्शन
विरेंद्र सोळंके, अॅड. डक यांची पत्रकार परिषदेत माहिती
माजलगाव (रिपोर्टर) खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त व सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त शहरामध्ये राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शनाचे आयोजन दि. 9 ते 13 डिसेंबर दरम्यान सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे मैदान, बायपास रोड, मंगलनाथ मंदिरासमोर करण्यात आले असुन देशातील 250 नामांकीत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती विरेंद्र सोळंके व संयोजन समितीचे सदस्य अॅड. बी. आर. डक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी ते बोलत होते. या राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 9 डिसेंबर ला आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते तर दि. 10 डिसेंबर रोजी स. 11.00 वा. शेतकरी मेळाव्यास राजेंद्र पवार हे मार्गदर्शन तर सायं. 6.00 वा. विवीध व्यापारी यांच्यासाठी मार्गदर्शन, दि. 11 डिसेंबरला सकाळी 11.00 वा. महिला बचत गट व महिला गृह लघुउद्योग मेळाव्यात रूपालीताई चाकणकर यांचे मार्गदर्शन, दु. 3.00 वा. महिला सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 12 डिसेंबर ला सरपंच/ग्रामसेवा सोसासयटी, चेअरमन मेळावा स. 11. वा. भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन, दु. 3.00 वा. विवीध फळ बागायतदार मेळाव्यास श्री. कसपटे साहेब, मारोतीराव जाधव, पतंगराव कदम यांचे मार्गदर्शन, दि. 13 डिसेंबर ला स. 11.00 वा. कृषी प्रक्रिया उद्योग मेळावा, दु. 1.00 वा. मल्टीस्टेट फेडरेशन कर्मचारी, अधिकारी तसेच कृषी उद्योग अर्थसहाय्य मार्गदर्शन मेळावा होणार आहे. दि. 13 डिसेंबर ला दु. 3.00 वाजता या राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. या कृषी प्रदर्शनात शेती अवजारे, बी बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधी, ग्रीन हाउस व साहितय, जैवतंत्रज्ञान, हॉर्टीकल्चर, सेरीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशूधन विकास, सौर उर्जा, जलव्यवस्थापन, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुट पालन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपारिक उर्जा, पणन व विपणन, आंतरराष्ट्ीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी अशा विवीध संस्था, अस्थापना, कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती विरेंद्र सोळंके व संयोजन समितीचे सदस्य अॅड. बी. आर. डक यांनी दिली. पत्रकार परिषदेस अच्युत लाटे, राहुल लंगडे, भगवान शेजुळ, शंतनु सोळंके, उपप्राचार्य श्री. मुळे सर, ओएस प्रशांत चव्हाण, विलास कुरे यांची उपस्थिती होती. आभार मंगलनाथ मल्टीस्टेटचे रविंद्र कानडे यांनी मानले.