बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे पाहून विभागीय आयुक्तांनी काल जिल्हा प्रशासनाला सक्तीच्या सूचना देत जिल्हा रुग्णालयातच कोरोना रुग्णांची चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी लॅब उभारा अशा सूचना दिल्यानंतर लॅबसाठी 1 कोटी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता काल विभागीय आयुक्त सुनिल केंेद्रेकर यांनी बीड येथे येवून जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबतचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला काही सूचना दिल्या. अॅन्टीजन टेस्ट ऐवजी आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश दिले. त्यासाठी रुग्णालयातच लॅब उभारा अशा सूचना दिल्यानंतर या लॅबसाठीचा 1 कोटी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव काल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला. सदरील हे लॅबचे काम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गिते, डॉ.ढाकणे, डॉ.बांगर यांच्या माध्यमातून होणार आहे.