Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईकॅनॉलमध्ये दोन मावस भाऊ वाहून गेले एकाचा मृतदेह सापडला

कॅनॉलमध्ये दोन मावस भाऊ वाहून गेले एकाचा मृतदेह सापडला


दुसर्‍याचा शोध सुरू
वाहून गेलेली मुलं गेवराई तालुक्यातील
गेवराई (रिपोर्टर):- पैठणच्या उजव्या कालव्यामध्ये दोन मुले वाहून गेली. या मध्ये एकाचा मृतदेह आढळून आला तर दुसर्‍याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे दोन्ही मुले सख्खे मावस भाऊ आहेत. या घटनेने गुळज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ दिवसापूर्वीच अन्य एक मुलगा ही वाहून गेला होता.


गुळज येथील भगवाननगर भागातील पैठणच्या उजव्या कालव्यामध्ये 13 आणि 12 वर्षाचे दोन मुले वाहून गेली. यामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला आहे तर अन्य दुसर्‍याचा मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत. एक तालुक्यातील रामपुरी तर दुसरा पैठण येथील रहिवाशी आहे. या घटनेने गुळज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उमापूर चौकीचे फौजदार बापासाहेब झिंजुर्डे सह अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. आठ दिवसापूर्वी याच परिसरातून अन्य एक मुलगा वाहून गेला होता. वेळेअभावी या दोन्ही मुलांचे नावे उपलब्ध होवू शकली नव्हती.

Most Popular

error: Content is protected !!