मुंबई (रिपोर्टर) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे स्थीर असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार
होणार असल्याचे बोलले जात असतानाच केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत देताना म्हटले किमहाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.दानवेंच्या या वक्त्यव्या नंतर राज्यातील शिंदे फडावणीसांचे सरकार अस्थिर असल्याचे दिसून येत आहे तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दावनेंच्या विधानावरुन,
हे सरकार 100 टक्के पडणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार
आणि दुसरीकडे मध्यावधींची चर्चा रंगली आहे.
राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेते मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी तोच सूर आळवला. जानेवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप सेनेची युती तुटली, गेल्या 2.5 वर्षांत चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं कुणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एक रात्रीत सरकार गेलं. आता, असंच राजकारण चाललं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणारय, याचा कोणी अंदाज लावला का? असे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या असं विधान केलंय. या सर्व नेत्यांच्या दाव्या मुळे राज्यातील शिंदे फडवणीस यांच्या सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे सांगणं कठीण आहे दानवे हे भाजपचे महाराष्ट्रातील जबाबदार नेते आहेत त्यांनीच मध्यावधीचे संकेत दिल्याने विरोधकांच्या दाव्याना अधिक बळ मिळत आहे .
हे सरकार शंभर टक्के
पडणार – संजय राऊत
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरे बोलून जातात. त्यामुळेच त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना कधी काय होईल याचा नेम नाही, असे बोलून मध्यावधीचे संकेत दिले आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.