परळी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून तालुक्यातील कवठली येथील एका 41 वर्षीय शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील शेतकर्याने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
कर्जबाजारी, नापिकी यासह इतर कारणांसाठी शेतकरी आत्महत्या करतात. दरवर्षी बीड जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त शेतकर्यांच्या आत्महत्या होतात. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली. परळी तालुक्णयातील अंकुश भानुदास गरड (वय 41) या शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.