Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड परळी परळी शहरात टायरच्या शोरुमला आग लाखो रुपयांचे नुकसान;

परळी शहरात टायरच्या शोरुमला आग लाखो रुपयांचे नुकसान;

आज सकाळी घडली दुर्दैवी घटना

परळी (रिपोर्टर):- परळी शहरातील टायरच्या शोरूमला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाने आग विझवली. यामध्ये सदरील दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग नेमकी लागली कशी? हे मात्र समजू शकले नाही.


   प्रा. मधुकर आघाव यांचे वैद्यनाथ मंदिर मुख्य रस्त्यावर प्रतिक टायर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाला आज सकाळी आग लागली. आग लागल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी त्याठिकाणी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती. आग विझवण्यासाठी परळी नगर परिषद व औष्णीक विद्युत केंद्राच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आली. या आगीमध्ये शोरुममधील टायर जळून खाक झाले. शोरुमचेही मोठे नुकसान झाले. लाखो रुपयांचे नुकसान या आगीमध्ये झाले आहे. सदरील आग नेमकी कशी लागली हे मात्र समजू शकले नाही.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....