बीड (रिपोर्टर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरम बीडच्या वतीने संविधान दिनानिमित्त दि. 26 ते 27 नोव्हेंबर रोजी बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधानदिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशीच संविधान समितीकडून मान्यता मिळाली होत. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली आहेत. या काळात भारतीय संविधानाची अंमलबजावणी कशा प्रकारे झाली या आपल्या समोर काय आव्हाने आहेत याची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी म्हणून या व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रा. सुर्यकांत गायकवाड यांचे व्याख्यान तर दि. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उच्च न्यायालयाचे रविंद्र बोर्डे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरमचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव साळवे, सचिव अॅड. विजयकुमार शिंदे, उपाध्यक्ष अॅड. ओ.डी. गायकवाड, सहसचिव अॅड. राहुल के. वडमारे, कोषाध्यक्ष अॅड. सचिन ओव्हाळ, महिला प्रतिनिधी- अॅड. सायली सुतार (वाघमारे) व समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरमचे सर्व सदस्य बीड यांनी आवाहन केले आहे.