केज (रिपोर्टर)केज शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे सुरू असून नांदुरघाट येथे मटक्यावर धाड टाकण्यात आली. त्याचबरोबर साळेगाव येथेही एका व्यक्तीवर कारवाई झाली.
नांदुरघाट येथे कल्याण नावाचा मटका घेत असताना फिरोज हमीद शेख, गणेश मधुकर जाधव, सलीम गणी यांच्यावर कारवाई करून 11 हजार 390 रुपये जप्त करण्यात आले. साळेगावमध्ये टपरीवर मटका घेताना गोविंद नागोराव इंगळे, ओम गुंड, राहुल पाटील, रणजीत मडके, कोंडीबा कसबे, राखुंडे गोपाळ, सिद्धु गुंड यांच्यावर कारवाई करून 8 हजार 130 रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक यांचे पथक व केज पोलिसांनी केली.












