बीड – ऑनलाईन रिपोर्टर
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातल्याचे पाहून निवडणूक लढण्या पूर्वीच विरोधकांनी तलवार म्यान करत सत्ताधारी पक्षावर आरोप करत मतदानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली. दस्तुरखुद्द भाजपा नेत्या पंकजा मुंढेंनीच आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली
पंकजा मुंडे निवडणूक न लढता म्हणाल्या कि बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट करत कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या आरोप त्यांनी या वेळी केला
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले. कर्ज बुडव्यांना बाजूला ठेऊन बॅक नफ्यात आणली, कारभार सुरळीत केला. सुरवातीला लोकांना देण्यासाठी एक रूपया देखील नव्हता, परंतू चांगला कारभार करत लोकांना बोलावून त्यांच्या ठेवी परत दिल्या असे त्या म्हणाल्या.
पत्रकार परिषदेस माजी आमदार भीमसेन धोंडे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा आदी उपस्थित होते.