बीड (रिपोर्टर) भरधाव वेगात निघालेल्या दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने या अपघातात पाटोदा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून ठार झाल्याची घटना रात्री मांजरसुंब्याजवळ घडली. यात अन्य एक जण जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेश रामदास देवकर (रा. बीड) हे पाटोदा तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. काल ड्युटी संपून ते बीडकडे मोटार-सायकरवरून येत होते. मांजरसुंब्याजवळ त्यांच्या गाडीची आणि समोरून येणार्या दुसर्या गाडीची समोरासमोर धडक झाली. यात गणेश देवकर हे गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाले. दुसर्या मोटारसायकलस्वारास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.