बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कालची शेवटची तारीख होती. ऑनलाईन प्रक्रियेत अडथळा आल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. रात्री जवळपास नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात सरपंचपदासाठी 4216 तर सदस्यासाठी 19861 अर्ज दाखल झालेले आहेत.
ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कालची शेवटची तारीख होती. ऑनलाईनमध्ये बिघाड झाल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्वीकारले. काल प्रत्येक तालुका तहसील कार्यालयात इच्छुकांची तोबा गर्दी उसळली होती. नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे अर्ज सादर केले. सरपंच पदासाठी 4216 तर सदस्यासाठी 19861 अर्ज आलेले आहेत.
दाखल झालेले तालुकानिहाय उमेदवारी अर्ज
तालुका ग्रा.पं. सरपंच सदस्य
बीड 132 722 3404
आष्टी 109 742 3273
पाटोदा 34 220 937
शिरूर 24 164 785
गेवराई 76 472 2382
माजलगाव 44 248 1191
वडवणी 25 160 729
धारूर 31 167 758
केज 66 357 1803
अंबाजोगाई 83 417 2181
परळी 80 547 2418