मुंबई (रिपोर्टर) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या तारीख जाहीर करण्यात आली आहे. 07 मे 2023 रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
नीट यूजी परीक्षेची तारीख लवकर जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नीटसोबतच छढ- ने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठ प्रवेश परीक्षाचे वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. गएए मेन सत्र 1 ची परीक्षा जानेवारी आणि सत्र 2 ची परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होईल. तसेचर उणएढ मे-जून महिन्यात घेण्यात येणार आहे.
जेईई मेनसाठी नोंदणी आधीच सुरू झाली आहे. दरम्यान छढ- ने इतर परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लवकरच रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर करण्यात येतील.
एनटीए लवकरच नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. निट युजी 2023 चे नोंदणी अर्ज या अधिकृत वेबसाइट- पींर.रल.ळप, पशशीं.पींर.पळल.ळप वर प्रसिद्ध केले जातील. निट 2023 चा अर्ज जारी झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थी अर्ज शुल्क भरून अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकतील.