Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडबीडचे माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कारभारी यांचे निधन

बीडचे माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कारभारी यांचे निधन


बीड (रिपोर्टर):- बीडचे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधवराव गोविंदराव कारभारी यांचे रात्री लातूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. माधवराव कारभारी हे मुळचे लातूर जिल्ह्यातील वाढवणा येथील होते. त्यांच्या पोलीस सेवेतील कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले होते. कारभारी यांनी बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज केले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. बीड येथेच ते सेवानिवृत्त झाले होते. कारभारी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!