वडवणी (रिपोर्टर):- शासकिय बँकेसह सोसायटीच्या कर्जाचे डोंगर यात आईच्या सतत आजारपणाला कोठून पैसे आणायचे या नैराश्यपायी मोरवड येथील 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने विहिरीत उडी घेत जलसमाधी घेतली असल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रल्हाद राजाभाऊ शेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकर्याचे नाव आहे. त्यांना मोरवड गांवा शेजारीच साधारणता दोन एकर शेती आहे.इतरत्र कोणताही आर्थिक सोर्स नाही यामुळे कुंटुबिक संपुर्ण जिवन हे शेतीवरच अंवलबुन आहे.यात शासकिय बँकेसह सोसायटीचे कर्ज घेतले होते.हे कशाच्या पायी परतफेड करायची यात आईचे सतत आजारपण असल्याने याला देखील कुठून पैसा आणायचा या नैराश्यपायी प्रल्हाद राजाभाऊ शेंडगे यांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतातुन चक्कर मारून येतो म्हणून गेले तर घरी परतलेच नाही तेव्हा घरी न आलेले प्रल्हाद शेंडगे यांचा शोध घेतला तेव्हा विहिरी शेजारी चप्पल आढळून आली आणि सशंय व्यक्त झाला कि विहिरीत उडी घेतली आहे.तेव्हा ग्रामस्थाच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा करुन सुमारे पहाटे 3 वा. मृतदेह आढळून आला आहे.पोलीस पंचनामा करुन श्वविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला असून या घटनेन मोरवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रल्हाद शेंडगे यांच्या पश्चात आई वडिल, पत्नी दोन मुली सह एक मुलगा असा परिवार आहे.असं सांगण्यात आलं आहे.
ट्रक्टर ड्रायव्हरचा कर्नाटकात दुदैवी मृत्यु
वडवणी तालुक्यातील तिगांव तांडा येथील राजेश प्रकाश चव्हाण (वय 25 वर्ष ) हा तरुण कर्नाटक राज्यातील बसवेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणी वाहतुक करणार्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामासाठी गेला होता.ऊसतोड करुन कारखान्या जवळ येऊन लंघू शंकेसाठी ट्रॅक्टरमागे थांबला आसता ट्रक्टर मागे सरकले आणि यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.हि घटना मध्यरात्री झाली असून आज दुपार पर्यत मृतदेह गांवी येणार असल्याच सांगण्यात आले आहे.