बीड (रिपोर्टर) या जगामध्ये अजातशत्रु माणूस शोधूनही सापडणार नाही. दोन प्रकारच्या शत्रुंशी लढत प्रत्येक माणसाला आपली जीवनवाट चोखळावी लागते. पहिल्या प्रकारात मोडणारे शत्रु माणसांच्या अंतरंगात असतात, मनात असतात आणि दुसरा शत्रु हा जगाच्या कानाकोपर्यात आणि बगलेतही असतो. अशा स्थितीत अंतर्मनाच्या आणि बाह्यअंगाच्या शत्रुंची लढण्यासाठी मित्राची ढाल असेल तर त्या माणसाला जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. अशीच मित्रत्वाची ढाल माजीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वाल्मिक कराड यांच्या साथीने पहावयास मिळते. धनंजय मुंडे यांचे समाजकारण असो अथवा राजकारण असो, या दोनही कर्तव्यकर्मात वाल्मिक कराड हे आघाडीवर असतात. निवडणूक कुठलीही असो तिची व्युहरचना आखणे, ती व्युहरचना धनंजय मुंडेंसमोर मांडणे, लोकांना विश्वासात घेवून धनंजय मुंडे आणि लोकांमधला सेतु बनने आणि कुठल्याही स्थितीत आपल्या साहेबांचे, धनुभाऊचे वर्चस्व गावागावात राहणे हेच ध्येय ठेवल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आणि प्रामुख्याने धनंजय मुंडेंना परळी तालुक्यात आणि विधानसभेतील अंबाजोगाई तालुक्यातल्या गावात प्रचंड यश प्राप्त झाले. कतृत्वकर्मात, यश-अपयशात, सोबत असलेला मित्र आणि दोघातला विश्वास हे यशाचे गमक यामुळेच मांडले जाते.
महाराष्ट्राची बुलंत तोफ, कष्टकरी,कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचे लोकनेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत कष्टातून राजकारणामध्ये यशस्वी झालेले धनंजय मुंडे हे समाजकारणाला अधिक महत्व देतात. म्हणूनच बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात धनंजय मुंडे यांचे नाव आदराने घेतले जाते. गेल्या तीन दशकाच्या कालखंडापासून धनंजय मुंडे यांच्यासोबत सखा म्हणून पडद्याआड काम करणारे वाल्मीक कराड यांचे मित्रत्व सिध्दीतले कर्तव्य दखलपात्र म्हणावे लागेल. धनंजय मुंडेंचे कुठलेही काम असो, मग ते राजकीय, सामाजिक अथवा अन्य कुठले त्या कामाचे नियोजन, त्या कामाचे आयोजन आणि ते काम सिध्दीस नेण्याचे कर्तव्य धनंजय मुंडेंच्य सुचनेवरून वाल्मिक कराड हे सातत्याने पार पाडतात. विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यामध्ये पडद्यामागून नियोजन आणि आयोजन करणारे वाल्मीक कराड हे कधीही प्रसिध्दीच्या झोतात येत नाहीत. सत्ताकारणाची नशा ही चांगल्या चांगल्यांना अभिलाषीक बनवते. मात्र इथे साहेब हेच सर्वस्व. धनंजय हेच नेतृत्व माननार्या वाल्मिक कराडांनी काल परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जे राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून दिले त्यामध्ये कराडांचा वाटा हा ते स्वत: काहीच समजत नसले तरी त्यांचे आयोजन, नियोजन आणि सेतू होण्याची भूमिका त्यांना वाटा द्यायला भाग पाडते. परळी तालुक्यातील आणि विधानसभा मतदार संघात असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील गावांमध्ये ग्रा.पं.निवडणूकीचे निकाल धनंजय मुंडेंचे नेतृत्व स्विकारणारे ठरले. या निवडणूकीमध्ये कुठल्या गावांमध्ये कुठल्या समस्या आहेत, तिथल्या गावातल्या नागरिकांना कुठले विकासकामे हवे आहेत? ते धनंजय मुंडेंपर्यंत नेणे, विश्वास आणि विकासात्मक दृष्टीकोनाचे आश्वासक म्हणणे गावकर्यासमोर मांडणे हे वाल्मिक कराडांनी यथोयोचित केले. त्यातूनच हे घवघवीत यश मिळाले. 70 टक्के ग्रामपंचायतीवर या भागात आज धनंजय मुंडेंचा वरचष्मा आहे. तो केवळ विकासात्मक दृष्टीकोनामुळे आणि वाल्मिक कराडांच्या आयोजनामुळे.