गेवराई (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या विरुध्द हिवाळी अधिवेशन संपे पर्यंत केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन केले. निलंबनाची कारवाई अत्यंत दुर्दैवी असून ती मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि विरोधी सदस्य सर्वसामान्यांचे प्रश्न विधीमंडळात मोठ्या प्रमाणावर मांडत असुन सत्ताधार्यांकडुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राचे आणि देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु आंबेडकर आदी महापुरुषांची राज्यपाल आणि सत्ताधार्यांनी केलेली बदनामी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सक्तीची विज बील वसुली, महागाई आदी प्रश्न उपस्थित करण्याचे काम राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षाचे सदस्य करत आहेत. आ. जयंत पाटील हे अनुभवी सदस्य असुन ते आक्रमकपणे विरोधी पक्षाची भुमिका मांडत आहेत त्यामुळेच सत्ताधार्यांनी त्यांना जाणिवपुर्वक निलंबीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन तिव्र अंदोलन करुन तहसिलदार सचिन खाडे यांना निवेदन दिले. या अंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाषराव मस्के, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, माजी उप नगराध्यक्ष शेख खाजाभाई, राजाभाऊ वारंगे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, खालेद कुरेशी, गोरख शिंदे, हनुमान गोडसे, शेख बाबुभाई (जेके), दिनेश घोडके, संदिप मडके, राधेशाम येवले, अशोक नाईकवाडे, संजय पुरणपोळे, गंगाभिषण नाईकवाडे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, सरपंच गणेश शिंदे, आसाराम रोडगे, डिगांबर खरात, कैलास माने, मच्छिंद्र भोले, रियाज कुरेश, सरवर पठाण, पद्मराज मस्के, शेख मकसुद, नईम राज, महादेव आगुंडे, वैभव दाभाडे, विष्णूपंत घोंगडे, जयसिंग माने, रविंद्र शिर्के, सुभाष गुंजाळ, अमित वैद्य, राजु पठाण, ऋषी सिरसट, कृष्णकांत पाटील, संग्राम पंडित, सय्यद रियाज, भारत शेंद्रे, वैजिनाथ कुलकर्णी, धर्मा कदम, मच्छिंद्र खरात, रवि भुजंगे, कांता नवपुते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.