बीड (रिपोर्टर) आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने धावणे महत्वाचे आहे. हा उदात्त हेतू ठेवून नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी ‘रन फॉर हेल्थ’चे आयोजन मेडिकल असोसिएशन ऑफ बीड, रोटरी क्लब ऑफ बीड सिटी आणि सीएनएसच्या वतीने मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये निरोगी आरोग्यासाठी बीडकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
नववर्षाचा संकल्प करूया निरोगी आयुष्याचा, असे म्हणत शेकडो बीडकर आज सकाळी चर्हाटा रोडने धावले. इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब आणि सीएनएसच्या वतीने रन फॉर हेल्थ या 10 आणि 5 किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने लहान-थोरांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये विशेष करून डॉक्टर, वकील, पत्रकारसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे.