Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनारिलायन्स पेट्रोल पंप ते अंबिका चौक मार्गे भरधाव धावतात वाळुचे टिप्पर नागरिकांना...

रिलायन्स पेट्रोल पंप ते अंबिका चौक मार्गे भरधाव धावतात वाळुचे टिप्पर नागरिकांना धोका, कारवाई करण्याची मागणी

बीड (रिपोर्टर):- वाळु माफियांनी बीड जिल्ह्यात उच्छाद माजवला असून लपूनछपून भरधाव वेगात टिप्पर चालवले जातात. जालना रोड येथील रिलायन्स पेट्रोल पंप ते कॅनॉल रोड, अंबिका चौक मार्गे बहुतांश टिप्पर दररोज ये-जा करतात. या टिप्परमुळे परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका असून टिप्परचालक वेगाने गाड्या चालवत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. सदरील टिप्पर चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी राजू महुवाले यांनी केली आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
गेल्या काही महिन्यांपासून जालना रोडपासून कॅनॉल रोड मार्गे अंबिका चौक, शाहूनगर मार्गे वाळुचे टिप्पर रात्री-अपरात्री धावतात. या टिप्परांचा वेग इतका असतो की, परिसरातील नागरिकांना धुळीचा तर त्रास सहन करावाच लागतो. मात्र यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळु असल्याने येथील रस्ताही खराब होऊ लागलाय. प्रशासनाने याची दखल घेत सदरील टिप्पर चालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी दक्षता कमिटीचे सदस्य राजू महुवाले यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!