दोनशे कर्मचार्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम हाती मोहिमेला मोठ्या निधीची गरज लोकसहभाग महत्वाचा
बीड (रिपोर्टर) बिंदुसरेचं पात्र गाळ आणि कचर्याने भरू लागले. हे पात्र स्वच्छ करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह नगरपालिकेने पुढाकार घेतला. आज सकाळी थंडीच्या कडाक्यात न.प.चे दोनशे कर्मचारी पात्र स्वच्छ करण्यासाठी सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व न.प.च्या सीओ अंधारे यांची उपस्थिती होती.
बीड शहरातून बिंदुसरा नदी जाते. नदी पात्रात अनेक जण कचरा टाकतात. त्यामुळे बिंदुसरेचं पात्र दूषित होऊ लागलं. गेल्या काही वर्षांपुर्वी बिंदुसरा पात्राची साफसफाई करण्यात आली होती. त्यातील झाडे तोडण्यात आली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात हे पात्र स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष झाले. बार्शी नाका ते मोंढा रस्त्याच्या दरम्यान पात्रात मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली आहे. (पान 7 वर)
त्याचबरोबर आजुबाजुला झाडांची संख्याही वाढल्याने यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले. पात्र स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकार्यांसह नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. आज सकाळी थंडी आणि धुक्यात न.प.चे दोनशे कर्मचारी पात्र स्वच्छ करण्यासाठी सरसावले होते. जेसीबीसह इतर साहित्य घेऊन कर्मचार्यांनी हे पात्र स्वच्छ केले. या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, न.प.च्या सीओ नीता अंधारे व इतर न.प.चे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
नदीचं पात्र स्वच्छ करणं हे माझं स्वप्न -जिल्हाधिकारी
नदीचे पात्र स्वच्छ करणे हे आमचं एक स्वप्न आहे. हे पात्र स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य आणि माणसांची गरज लागणार आहे. हे काम करत असताना मदतीची गरज भासणार आहे. खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी काही संस्था मदत करण्याच्या तयारीत आहेत, नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी एक मोहीम सुरू करू शकतो, असे या वेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी या वेळी म्हटले.
रुग्णालयातील कचरा नदीपात्रात नको, त्यासाठी स्ट्रिक्ट मोहीम हाती घेऊ -अंधारे
शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आजपासून मोहीम उघडली आहे. मुख्याधिकारी म्हणून आताच मी चार्ज घेतला आहे, आठच दिवस झाले आहेत. बिंदुसरा स्वच्छतेबाबत मोहीम हाती घेतली. खरंतर याला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे, परंतु ही मोहीम पुर्णत्वास नेण्यासाठी लोकसहभाग आणि जे जे लोक सहभागी होतील त्यांच्या मदतीने ही साफसफाईची मोहीम पुढे राबवू शकतो, असे म्हणत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे म्हणाल्या, राहीला बायोमेडिकल वेस्टचा विषय त्या कचर्यावर प्रोसेसिंग करूनच डम्पिंग केले पाहिजे, रुग्णालयातील कचरा नदी पात्रात नसायलाच हवा त्यासाठी स्ट्रिक्ट मोहीम हाती घेऊ असेही अंधारे म्हणून सर्व कर्मचारी या कामात सहभागी झाले. त्यांचे त्यांनी कौतुक केले.