बीड (रिपोर्टर) बिनविरोध निघालेल्या बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा तर उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे यांची आज शुक्रवारी बिनवीरोध निवड जाहिर करण्यात आली असुन या निवडीचे जिल्हाभरातुन स्वागत होत आहे.
बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची नुकतीच पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. आज शुक्रवार 13 जानेवारी 2023 रोजी बँकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्हि.एस.जगदाळे तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी जाधव एस. बी. यांच्या प्रमुख उपस्थीतीत मंत्री बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली.अध्यक्षपदासाठी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सुचक म्हणून सतीश धारकर तर अनुमोदक म्हणून शेख मोहम्मद सलीम मोहम्मद फकीर हे राहिले.अध्यक्षपदासाठी डॉ.आदित्य सारडा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी शुभम प्रदीप चितलांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांना सुचक म्हणून रधुनाथ चौधरी तर अनुमोदक म्हणून प्रल्हाद वाघ राहिले. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी संचालक मंडळांच्या उपस्थीतीत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी जाहिर होताच डॉ.आदित्य सारडा व शुभम चितलांगे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल जिल्हाभरातुन स्वागत होत आहे.
बँकेला गतवैभव मिळवुन देणार
– डॉ.आदित्य सारडा
आमच्या संचालक मंडळात सर्व तरूण मंडळी बँकेच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणार आहोत. आम्ही बँक निर्बंध मुक्त करण्यासाठी बँकेची तरलता,कर्ज वसुली, ठेवी मिळवणे याच बरोबर सर्व निकष पूर्ण करून बँकेला गतवैभव मिळवुन देणार आहे. आजपर्यंत खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही या पुढेही खातेदार व ठेवीदारांचे बँक हित जोपासणार आहे.असे व्दारकादास मंत्री बँकेचे नुतन अध्यक्ष डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी प्रतिक्रिया देतांना सांगीतले आहे.