बीड (रिपोर्टर) लोकनेता सुरक्षित आणि सिद्ध व्हावा यासाठी समान्य जनता आपली सद्भावना आपल्या श्रद्धेचा ठायी व्यक्त केल्या जातात. दक्षिणमुखी हनुमान तीर्थक्षेत्र वायबटवाडी हे बीड शहर नजीक असलेल्या जागृत देवस्थान येथे माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या दीर्घायू साठी महाभिषेक घालण्यात आला. काही दिवसा पूर्वी झालेल्या अपघातातून सुखरूप असलेले लोकनेते धनंजय मुंडे यांना सुरक्षित ठेवावे यासाठी गावकरी जनतेने मारुती कडे साकडे घातले.
आपल नेतृत्व निरामयी व सुरक्षित असावे हे त्या नेत्याच्या माती व माणसाला नेहमीच वाटते यासाठी ते आपल्या श्रद्धा अर्पित करत असतात. लोकनेते धनंजय मुंडे यांच्या आरोग्यासाठी बीड तालुक्यातील युवकांनी वायबटवाडी येथे महाअभिषेक घातला . समाधान तावरे, संतोष सिंघन, कृष्णा सिंघन, पिनु साळुंके, नारायण निर्धार, हनुमान साळुंके, बबन तावरे, पोलीस पाटील दत्ता शिंघन, कृष्णा निर्धार, सुरेश वायबट, सुरज वायबट, रोहित तावरे, ऋतुराज वायबट यांच्या नेतृत्वात गावकरी व भाविकांनी महाभिषेक केला. हभप पुरोहित मुकुंद भोगे यांनी महाभिषेक मंत्रोच्चारात संपन्न केला.