Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनापरळीत कडक निर्बंधांचे पालन करा, अधिकारी, डॉक्टर्स आदींच्या बैठकीत धनंजय मुंडेंचे निर्देश

परळीत कडक निर्बंधांचे पालन करा, अधिकारी, डॉक्टर्स आदींच्या बैठकीत धनंजय मुंडेंचे निर्देश

परळी : कै. पंडितअण्णा मुंडे हॉस्पिटल, डॉ. बलुतकर यांचे सुधान्शु सिटी स्कॅन सेंटर येथे धनंजय मुंडेंनी दिली भेट

परळी (रिपोर्टर):- पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या कै. पंडितअण्णा मुंडे कोविड हॉस्पिटल, डॉ. बलुतकर यांचे सुधान्शु सिटी स्कॅन सेंटरमध्ये भेटी देऊन पाहणी केली. यावेळी तेथील उपलब्ध सुविधांचा ना. मुंडेंनी आढावा घेतला.
रुग्णांच्या नातेवाईकांना सततच्या वावरामुळे बाधा होण्याचा धोका उद्भवतो त्यामुळे रुग्णालय परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांचा वावर मर्यादित करावा, कोरोनाग्रस्त रुग्णांना समुपदेशन व मानसिक आधार देणे तसेच आवश्यक असणार्‍या जास्तीत जास्त बाबी रुग्णालयाने स्वतः उपलब्ध कराव्यात अशा सूचनाही ना. मुंडेंनी यावेळी केल्या. सिटी स्कॅन साठी दिवसात 100 हून अधिक लोक येतात, गर्दी होते, यामुळे सिटी स्कॅन साठी नोंद करून वेळ निश्चित करून एसएमएस द्वारे 5-5 रुग्णांना बोलवण्याचे नियोजन करावे अशी सूचना ना. मुंडेंनी सुधान्शु सिटी स्कॅन चे डॉ. बलुतकर यांना केली.
परळीतील सर्व खाजगी डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी यांची मुंडेंनी येथील शासकीय विश्रामगृहात एकत्रित बैठक घेऊन, रुग्णांच्या नातेवाईकांचा वावर मर्यादित करणे, याचबरोबर शहरात लागू असलेल्या निर्बंधांचे कडक पालन केले जावे याबाबतही संबंधितांना सूचना केल्या आहेत. परळीतील सर्वच डॉक्टर्स या काळात अविरत काम करत असून, हे आव्हान पेलण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुंडेंनी दिली. यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड,  रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुर्मे, डॉ. शेख यांच्यासह शहरातील सर्व नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!