बीड (रिपोर्टर) बीड शहरातील किल्ला मैदान येथील मिल्लिया महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सायंकाळी मोहम्मद उमरेन महेफुज रहेमानी यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. सदरील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक आणि धार्मिक विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मोहम्मद उमरेन महेफुज रहेमानी यांचे व्याख्यान आज सायंकाळी 6 वाजता मिल्लिया ग्राऊंडमध्ये आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शेख अहेमद साहेब काशमी, मोहियोद्दीन कासमी, मौलाना मुफ्ती मुआज आणि मौलाना अखिल अहेमद, मौलाना आमीन, मुफ्ती अब्दुल्ला, अब्दुल बाखी, मौलाना जाहीद, मौलाना अब्दुल रहीम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सदरील या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.