Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडसंवेदनशिल मनाचं सुक्ष्म नियोजन; राज्याला सक्षम मंत्री लाभला, माजी आमदाराकडून पत्राद्वारे ना.धनंजय...

संवेदनशिल मनाचं सुक्ष्म नियोजन; राज्याला सक्षम मंत्री लाभला, माजी आमदाराकडून पत्राद्वारे ना.धनंजय मुंडेंचं कौतुकबीड (रिपोर्टर):- विधान परिषदेचे माजी आमदार जयवंतराव जाधव यांनी पत्र लिहून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप मारली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात राज्याला व आपल्या बीड जिल्ह्याला ज्या पद्धतीने धीर दिला ते आपले कौशल्य कौतुकास्पद आहे. आपलं नियोजन पाहता केवळ आपला आदर करावासा वाटतो. आजच्या गलिच्छ राजकारणाकडे दुर्लक्ष करून ज्या पद्धतीने कोव्हिड बाबत काम करत आहात त्यासाठी संवेदनशिल मन असावं लागतं. ते मन तुमच्याकडे आहे. म्हणूनच आपल्याकडून कोव्हिडच्या महामारीत सुक्ष्म नियोजन होत आहे. असं माजी आमदार जयवंतराव जाधवांनी या पत्रात म्हटलं आहे.
प्रति,
आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य.
आज आपणांशी हा मनातला संवाद, आपण कोरोना या महामारीच्या संटात राज्याला व आपल्या बीड जिल्ह्याला ज्या प्रकारे धिर देत आहात आणि सोबतच आपल्या कौशल्यपूर्ण नियोजनाने परिस्थितीशी लढत आहात त्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी.
परिस्थिती हाताबाहेर जात असताना मनाला एक समाधान आहे ते म्हणजे परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत ते खरेच दाद देण्यायोग्य आहेत. सामाजिक न्याय मंत्री म्हणून उपेक्षितांना व विद्यार्थ्यांना आपण विविध योजनांचा लाभ तर देतच आहात, पण पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचे व परळी मतदार संघाचे पालकत्व ज्या पद्धतीने निभावत आहात ते खरोखरच अभिमानास्पद आहे. परळीच्या औष्णिक विज निर्मिती केंद्राचा उपयोग ऑक्सिजन निर्मितीसाठी करून घेत आपली अभ्यासू वृत्ती प्रत्यक्षात उपयोगात आणावयाची क्षमताही सिद्ध केली. गलिच्छ राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपण कोविड सेंटर्स उभारली नव्हे तर विक्रमी वेळेत उभारली. ऑक्सिजन, इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांची कमतरता असताना त्याचे उत्कृष्ट नियोजन केलेत.
अजूनही सगळे आवाक्यात नाही हे जरी खरं असलं तरी आपण ज्या कल्पकतेने आणि सुक्ष्म नियोजनाने शासकीय यंत्रणा राबवित आहात यासाठी साहेब आपणास मन:पूर्वक सलाम…!
धनूभाऊ, आपण करीत असलेले हे कार्य करण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं म्हणूनच राज्याला आपल्या रुपाने एक सक्षम मंत्री लाभला याचा मला अभिमान आहे.
आदरणीय शरद पवार साहेब, अजितदादा पवार, जयंत पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांची जी सेवा करत आहात अशा मानवतेच्या कार्यासाठी शुभेच्छा व आपल्याही निरोगी आरोग्यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…!

सदैव तुमचाच,
जयवंतराव जाधव,
माजी विधान परिषद सदस्य, नाशिक.

patr

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!