Friday, May 7, 2021
No menu items!
Homeक्राईमआयपीएलवर सट्टा लावणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

आयपीएलवर सट्टा लावणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

अंबाजोगाईत पोलिस उपअधिक्षक सुनिल जायभाये यांची कारवाई
अंबाजोगाई | रिपोर्टर
आयपीएलवर सट्टा लावणार्‍या चौघांना अंबाजोगाईचे पोलिस उपअधिक्षक सुनिल जायभाये आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई (काल दि. २७ एप्रिल रोजी) कुत्तर विहिर, तानाजी मालुसरे चौक परिसरात केली.
येथील कुत्तर विहिर,तानाजी मालुसरे चौक परिसरात येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता काही इसम लॅपटॉप, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आयपीएल मॅच मध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर या क्रिकेट मॅच वर सट्टा लावून खेळत व खेळवीत असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये यांना मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. चोरगे, पोउपनि. गव्हाणे,पोलीस अमलदार आतकरे,कागणे, खरटमोल,घुगे, कसबे, महिला पोलीस अमलदार घोंगाने व दोन पंचया ठिकाणी धाड टाकली. तेव्हा मिळालेल्या माहितीप्रमाणे आयपीएल सट्टा सुरू असलेल्या दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर या मॅचचे थेट प्रेक्षेपण पाहून मोबाईल, लॅपटॉप ,प्रिंटर, एलइडी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे लोकांसोबत सट्टा पैशावर खेळत व खेळवीत असताना गोपाळराव धायगुडे, लक्ष्मीकांत धायगुडे, शुभम धायगुडे, संदीप गायकवाड यांना जागीच पकडले.तर इतर खेळणारे सात लोक पोलिसांना पाहून पळून गेले.ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून नगदी रक्कम १४३०रुपये व मोबाईल, लॅपटॉप ,प्रिंटर, एलइडी असा ७५९३०/- रुपये चा जुगररच्या मुद्दे मलासह मिळून आले.पोलीस अमालदर कसबे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये वरील आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!