दोन वर्षात ग्रामीण भागातल्या समस्या मार्गी लावणार -आ.संदीप क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी):- मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार असतांना बीड मतदार संघात विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला होता पण सत्तांतरामुळे मंजुर झालेल्या या कामास विलंब झाला. विद्यमान सरकारकडे परत एकदा पाठपुरावा करून मतदार संघात आज 8 कोटी 2 लक्ष रूपयांच्या विकास कामाचे प्रत्यक्ष सुरूवात व लोकार्पण होत असून आगामी दोन वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील सर्व समस्या मार्गी लावण्याचा मानस आहे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी वानगांव, अंजनवती, घारगावव गोलंग्री येथे आपल्या भाषणात केले.
गेल्या अनेक वर्षांपासून बीड मतदार संघातील अंजनवती येथे अंजनव तीसह घारगाव, बोरखेड, वडवाडी वानगावं आदी गावांसाठी 33/11 केव्ही उपकेंद्र व्हावे अशी मागणी होती. पूर्वी चौसाळा उपकेंद्रातून या गावांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होत होता त्यामुळे या भागातील शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान होत होते. वीज आणि पाण्याअभावी शेतकरी बांधवांचे उभे पीक जळून जात होते. ही गावे बीड मतदारसंघात असल्याने नागरीकांची मागणी व अडचण लक्षात घेत आ.संदीप भैय्या यांनी या विषयावर पाठपुरावा केला. पालकमंत्री, ऊर्जामंत्री, जागेसाठी महसूल विभाग आदींकडे बैठका घेतल्या. या उपकेंद्राच्या प्रत्यक्ष कामास आज
सुरूवात झाली असून येत्या काही महिन्यात हे काम पुर्ण होवून लोकार्पण सोहळा होणार आहे. यामुळे वीज उपकेंद्रामुळे अंजनवतीचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागला असून ग्रामस्थ समाधानी झाले आहेत. याबरोबरच अंजनवती उपकेंद्रामुळे घारगाव,बोरखेड,वडवाडी,वानगाव यासह अनेक गावातील ग्रामस्थांची विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तसेच बीड मतदारसंघातील व बालाघाटावरील वानगाव, गोलंग्री, घारगाव, अंजनवती येथील माताभगिणींच्या डोक्यावर सतत पाण्याचा हंडा असल्यामुळे पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला असून आता माता भगिणींच्या डोक्यावर हंडा दिसणार नाही याचे मोठे समाधान आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सदरील चार गावामध्ये 3 कोटी 86 लक्ष रूपयांची योजनेच्या प्रत्यक्ष कामाची सुरूवात आज झाली आहे. तसेच 15 वित्त आयोग, 2515, जिल्हा वार्षिक योजना यातून वानगाव, अंजनवती, (पान 7 वर)
घारगाव, गोलंग्री या गावातील रस्त्याची समस्या मागील अनेक वर्षापासून निर्माण झाली होती. यावेळी कायमस्वरूपी तोडगा काढुन 43 लक्ष रूपय तर वानगाव येथील बालकांसाठी अंगणवाडी खोली बांधकाम व्हावे ही मागणी पुर्ण होत असून यासाठी 10 लक्ष व घारगाव येथे शाळा खोली बांधकामासाठी 10 लक्ष रूपयाचा निधी मंजुर झाला आहे. गोलंग्री येथे सिमेंट बंधार्याची मागणी ग्रामस्थांची असल्यामुळे याकरिता 10 लक्ष रूपये तर घारगाव येथे 2515 अंतर्गत सभागृह बांधकामासाठी 8 लक्ष रूपये मंजुर झालेले आहेत. या कामाचा पाठपुरावा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे केलेला होताच पण सत्तांतरामुळे काही काळ मंजुर झालेल्या या निधीस विलंब झाला आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा विद्यमान सरकारकडे पाठपुरावा करून बीड मतदार संघातील बालाघाटाचा तसेच चौसाळा जि.प.गटाचा मोठ्या प्रमाणावर निधी येवून प्रत्यक्ष कामास सुरूवात आणि काही ठिकाणी पुर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण झाल्यामुळे मनाला मोठे समाधान झाले असून येणार्या दोन वर्षाया काळात बीड मतदार संघातील प्रत्येक गावा, वाडी, तांड्याच्या विविध समस्या सोडवणयाचा मानस असून या करिता पाठपुरावा करणे सुरू आहे. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, डॉ.बाबु जोगदंड यांच्यासह वानगाव, अंजनवती, घारगाव, गोलंग्री या गावातील सरपंच, उसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माताभगिणी, तरूण युवक, ज्येष्ठ नागरिकासह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थिती होते.