70 पेक्षा जास्त गाड्यांना दंड, अनाधिकृत बॅनर हटवले
नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर ग्रामपंचायतअंतर्गत विविध ठिकाणी अनाधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहे, हे सर्व बॅनर आज सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली हटवण्यात आले. वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला व्यस्थीत न लावता आडवे-तिडवे लावतात. बेशिस्त वाहन धारकांवर देखील कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत 70 वाहनधारकांना दंड आकारण्यात आला होता.
नेकनूर ग्रामपंचायत अंतर्गत विविध वार्डामध्ये आणि मुख्य रस्त्यावर अनाधिकृत कटआऊट लावण्यात आलेले आहे. या कटआऊटमुळे वाहतुकीला अडथळा तर होऊ लागला आहे. सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनखाली नेकनूर पोलिसांनी अनाधिकृत कटआऊट हटवले त्याचबरोबर वाहनधारक आपली वाहने आडवे-तिडवे लावत आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत 70 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली. या वेळी सहायक पोलीस अधिकारी विलास हजारे, उपनिरीक्षक पानपाटील, कर्मचारी अनवणे, दीपक खांडेकर, बांगर, क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे.