Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडअंधेर नगरी चौपट राज अर्धे बीड शहर अंधारात

अंधेर नगरी चौपट राज अर्धे बीड शहर अंधारात


बीड (रिपोर्टर):- नगरपालिकेत वर्षानुवर्षे सत्ता भोगणारे सत्ताधारी बीडकरांना मुलभूत सुविधाही देऊ शकत नाहीत. गेल्या महिन्याभरापुर्वीच संपुर्ण बीड शहर अंधारात होते. बीडकरांनी आवाज उठविल्यानंतर शहरातील पथदिवे सुरू झाले. मात्र काही दिवसातच पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच कारभार सध्या बीडमध्ये सुरू आहे.
गेल्या एक महिन्यापुर्वी बीड शहरातील सर्व पथदिवे बंद होते. त्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर शहरातील पथदिवे सुरू करण्यात आले मात्र पुन्हा अर्धे शहर अंधारात आहे. शहरातील मुख्य रस्ता सुभाष रोड, ना पुल ते माळीवेस, नगर रोड, सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, सावता माळी चौक, आदी भागातील रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. विद्युत बील थकल्याचे कारण दाखवत हे पथदिवे बंद करण्यात आले तर काही भागातील पथदिवे दिवसाही सुरु असतात. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे भुरटे चोरटे याचा फायदा घेत नागरिकांना लुटतात. शहरातील विविध पोलीस ठाण्यात रोज दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. हे केवळ शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे होत आहे. बंद पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!