Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाअंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून घेतले जातात ५ हजार रुपये

अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून घेतले जातात ५ हजार रुपये


कोरोना रुग्णांचे अंत्यविधी न.प.ने मोफत करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर):- बाधित रुग्णांचे अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात. नगरपालिकेच्या वतीने अंत्यविधी मोफत करावे किंवा नगरपालिकेच्या वतीने अंत्यविधीचे दर ठरवून द्यावेत. जेणेकरून स्मशानभूमीत नातेवाईकांची लूट होणार नाही, अशी मागणी नवनाथ नाईकवाडे यांनी न.प.चे सीओ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड शहरातील बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठाण स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडे पैसे मागितले जातात. अंत्यविधीसाठी ३ ते साडेतीन हजार रुपयांचा खर्च येतो. तो खर्च नगरपालिकेने करावा अन्यथा नगरपालिकेने तेथे दरपत्रक लावावे त्यामुळे नातेवाईकांची लूट होणार नाही. गॅस दाहिनी किवा विद्युत दाहिनी पांगरी रोड, पिंपळगव्हण रोड किंवा शिंदे नगर या भागात करावी, अशी मागणीही नवनाथ नाईकवाडे यांनी सीओ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!