गेवराई (रिपोर्टर) – महाराष्ट्र विधी सेवा समिती प्राधिकरण मुबंई व बीड जिल्हा विधी सेवा समिती बीड यांचे निर्देशानुसार गेवराई तालुका विधी सेवा समिती आणि गेवराई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 फेब्रु.रोजी गेवराई न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली.
या लोक अदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे मिळून 3500 प्रकरणे तसेच 4324 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित 92 दिवाणी व फौजदारी 15 तसेच दाखल पूर्व 63 प्रकरणे असे एकूण 170 प्रकरणे निकाली निघाली. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणात 17,80,430 रुपये वसूल झाले. या लोक अदालतमध्ये तीन पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.एम.घुगे , 2 रे सह दिवाणी न्यायाधीश के.एन.मराठे, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश एन.ए.रणदिवे यांनी काम पाहिले.
या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे , धनादेशची प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, ग्राम पंचायत प्रकरणे, नगर पालिका प्रकरणे, पोटगी प्रकरणे, ट्राफिक चलन प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आप आपसात मिटविण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होणेसाठी न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, व सदस्य, सर्व बँकांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, नगर पालिका, व न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.