Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडसाक्षाळपिंप्रीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

साक्षाळपिंप्रीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

बीड (रिपोर्टर):- 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर प्रत्येक लस केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. आज साक्षाळपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरश: नागरिकांची झुंबड उडाली होती. त्याठिकाणी कसल्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स दिसून आलेला नव्हता. सोशल डिस्टन्सबाबत येथील आरोग्य प्रशासनाने काळजी घ्यायला हवी व लोकांना एका रांगेमध्ये उभे करून लस द्यावी.


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 18 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवू लागला. बीड तालुक्यातील साीाळपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावासह परिसातील नागरिकांनी लस घेण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांनी इतकी गर्दी केली की, नियमाचे पुर्णत: उल्लंघन करण्यात आले. सोशल डिस्टन्स कसल्याही प्रकारचा पाळण्यात आलेला नाही. संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन नागरिकांना रांगेमध्ये उभे करून त्यानंतरच लस द्यायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे.


लस नसल्याने नागरिक आल्या पावले परतले
1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नोंदी केलेल्या आहेत. मात्र रुग्णालयात लसच नसल्याने अनेक नागरिक आज आल्या पावले परत गेले आहेत. लस नसल्याबद्दल ज्यांना माहिती नव्हती ते नागरिक आज रुग्णालयात आले होते. आता लस कधी उपलब्ध होईल हे अद्यापही प्रशासनाने जाहीर केले नाही.

Most Popular

error: Content is protected !!