गेवराई (रिपोर्टर) गोदावरी नदी पात्रासह अन्य नदींच्या पात्रातून सर्रासपणे अवैधरित्या वाळुचा उपसा सुरू आहे. तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी ठाण्याचा पदभार घेताच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नदीपात्रातून वाळुचा अवैध उपसा होत असल्याची माहिती वाघमोडे यांना झाल्यानंतर त्यांनी काल कारवाई करत ट्रॅक्टरसह 35 ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोदावरी नदी पात्रातून काही वाळू माफिया अवैधरित्या वाळुचा उपसा करून मोठी कमाई करतात. गंगाडी शिवारातील गोदावरी पात्रातून वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री घटनास्थळी जावून कारवाई केली. एक ट्रॅक्टर व 15 ब्रास वाळूसह एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वाघमोडे यांनी तलवाडा ठाण्याचा पदभार घेताच अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यास सुुरुवात केली. वाळू प्रकरणी आरोपी विजय भारत जायगुडे (रा. रामनगर ता. गेवराई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.