Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाआपल्याला उशीर झाला आयसीएमआरची कबुली

आपल्याला उशीर झाला आयसीएमआरची कबुली


नवी दिल्ली (वृत्तसेवा): भारताला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसला असून दैनंदिन रुग्णसंख्या साडे तीन लाखांवर पोहोचली आहे. सोबतच मृतांची संख्याही दिवसाला चार हजारांचा टप्पा गाठत असल्याने चिंतेत भर पडली आहे. रुग्णालयं आणि स्मशानभूमींमध्ये गर्दी झाल्याचं चित्र असून दुसरीकडे आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. काही तज्ज्ञांनी केलेले दाव्यानुसार, खरी रुग्ण आणि बळींची संख्या ही पाच ते १० पट अधिक असू शकते. करोना संकट असतानाही निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्याने लोकांनी रोष व्यक्त केला होता. याशिवाय लाखोंच्या संख्येने हजेरी लावलेले धार्मिक कार्यक्रमही केंद्राकडून रोखण्यात आले नाहीत. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी करोना संकटाला उत्तर देण्यास आपल्याला उशीर झाल्याचं मान्य केलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!