Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यातील कोविड रुग्णालयात परळीसारख्या सुविधा द्या -पोटभरे

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात परळीसारख्या सुविधा द्या -पोटभरे

खासगी डॉक्टराकडून सर्रासपणे आर्थिक लूट
बीड (रिपोर्टर):- कोरोनाची दुसरी लाट सुरू असून बीड जिल्ह्यामध्ये दररोज शेकड्याने पेशन्ट निघत आहेत. कोरोना परिस्थिती हाताळण्यात प्रशासकीय यंत्रणा पुर्णपणे निष्क्रीय ठरली आहे. रुग्णांचा गैरफायदा घेऊन कोविडच्या नावावर सर्रासपणे लूट होऊ लागली आहे. खासगी दवाखानेवाल्यांनी तर प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट चालवली आहे. खासगी रुग्णालयाचे बील तपासण्यासाठी पालकमंत्र्यांनी समिती नेमावी, अशी मागणी नियोजन समितीचे सदस्य बाबूराव पोटभरे यांनी केली आहे.
कोरोनामुळे अवघ्या देशातील परिस्थिती बिकट झाली. बीड जिल्ह्यात दररोज शेकडो रुग्ण निघत आहेत. सध्याचा काळ गंभीर असून प्रशासकीय यंत्रणा कोरोना हाताळण्यात निष्क्रीय ठरलेली आहे. त्यातच रुग्णांची खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होऊ लागली आहे. अव्वाचे सव्वा बिले रुग्णांच्या माथी मारली जात आहेत. संकटाच्या काळातही टाळूवरचे लोणी खाण्याचे काम खासगी डॉक्टर करत आहेत. खासगी डॉक्टरांनी दिलेल्या बिलाची तपासणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक समिती स्थापन करावी आणि समितीने सर्व खासगी डॉक्टरांचे बील तपासावे, अशी मागणी बाबूराव पोटभरे यांनी केले आहे. परळीच्या धर्तीवर पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात समान आरोग्य सेवा पुरवावी, खासगी डॉक्टरांकडून होणारी लूट थांबवावी, कोरोना रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवाव्यात, अशी मागणी बाबूराव पोटभरे यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!