पांगरी रोडवरील घटना
बीड (रिपोर्टर)-उभ्या असलेल्या बसवर मोटारसायकल धडकल्याने या अपघातात 18 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना रात्री पांगरी रोडवरील करपरा पुलाजवळ घडली. मयताचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.
पांगरी रोडच्या करपरा पुलाजवळ रात्री एसटी बस उभी होती, या बसवर अमोल प्रकाश मुंडे (वय 18, रा. वडमाऊली दहिफळ) या तरुणाची मोटारसायकल धडकली. यात तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. सदरील हा तरुण बीडमध्ये शिक्षणासाठी राहत होता. त्याच्या निधनाने वडमाऊली दहिफळ येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले.