बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये चर्चेत आहे. या प्रकरणातील दोेषी अधिकार्यांसह गुत्तेदार आणि कर्मचार्यात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जल धडक मोर्चा’ काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘जल है तो कल है, नही तो जलजीवन मिशन फेल है’, अशा पद्धतीचे फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
ग्रामीण भागाील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय जलमिशन योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक गावात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. या कामातील काही प्रकरणात अफरातफर झाली. चुकीच्या पद्धतीने टेंडर पद्धत राबविली गेली. काही गुत्तेदारांना नियम धाब्यावर बसवून कामे देण्यात आली. अधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या भ्रष्टपणामुळेच या योजनेचे तीनतेरा वाजू लागले. सदरील प्रकरणात जे अधिकारी, गुत्तेदार, कर्मचारी दोषी आहेत त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या तरीही कारवाई करण्यात आली नसून कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जलधडक मोर्चा काढण्यात आला होता. सदरील हा मोर्चा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा निघाला होता. मोर्चात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला पदाधिकार्यांसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. मोर्चामध्ये के.के.वडमारे, कमल निंबाळकर, विद्या जाधव, तांदळे, अॅड. हेमाताई पिंपळे सह आदी शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चामध्ये सहभाग होता. बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये चर्चेत आहे. या प्रकरणातील दोेषी अधिकार्यांसह गुत्तेदार आणि कर्मचार्यात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जल धडक मोर्चा’ काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘जल है तो कल है, नही तो जलजीवन मिशन फेल है’, अशा पद्धतीचे फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
ग्रामीण भागाील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय जलमिशन योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक गावात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. या कामातील काही प्रकरणात अफरातफर झाली. चुकीच्या पद्धतीने टेंडर पद्धत राबविली गेली. काही गुत्तेदारांना नियम धाब्यावर बसवून कामे देण्यात आली. अधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या भ्रष्टपणामुळेच या योजनेचे तीनतेरा वाजू लागले. सदरील प्रकरणात जे अधिकारी, गुत्तेदार, कर्मचारी दोषी आहेत त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या तरीही कारवाई करण्यात आली नसून कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जलधडक मोर्चा काढण्यात आला होता. सदरील हा मोर्चा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर यांनी काढला होता. प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा निघाला होता. मोर्चात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला पदाधिकार्यांसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. मोर्चामध्ये के.के.वडमारे, कमल निंबाळकर, विद्या जाधव, तांदळे, अॅड. हेमाताई पिंपळे सह आदी शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चामध्ये सहभाग होता.