Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडबीड शहरातील अनेक भागात महिन्यातून दोनदाच होतोय पाणीपुरवठा

बीड शहरातील अनेक भागात महिन्यातून दोनदाच होतोय पाणीपुरवठा

बीडला पाणीपुरवठा करणार्‍या दोन्ही धरणांना मुबलक पाणी असतानाही नगरपालिकेचा नियोजनशुन्य कारभार
बीड (रिपोर्टर):- बीड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या बिंदुसरा धरणासह माजलगाव डॅममध्ये मुबलक पाणीपुरवठा आहे मात्र बीड नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील अनेक भागात महिन्यातून केवळ दोनदाच पाणीपुरठा केला जातो. शिवाय पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर हे निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्यात अळ्या होतात. त्यामुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात येत असून नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांनी आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन हवेतच विरगळले आहे.
वर्षानुवर्षे नगरपालिका क्षीरसागरांच्या ताब्यात आहे. मात्र बीडकरांना क्षीरसागर मुलभूत सुविधा पुरवू शकले नाहीत. निवडणुकीच्या काळात विकासाची गंगा तुमच्या दारात आणतो म्हणणारे क्षीरसागर आता बीडकरांना महिन्यातून दोनदा पाणी सोडत आहेत. त्यातही अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होतो. पिण्याचे पाणी पंधरा दिवस साठवून ठेवावे लागत असल्याने त्यामध्ये अळ्या निर्माण होतात. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बीडकरांना आठ दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी बातमी काढून स्वत:ची वा वा करून घेतली होती. मात्र आजही 15 दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या दोन्ही धरणांना मुबलक पाणी असतानाही केवळ नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्याला तरसावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!