बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल, पहाटे चार वाजेपर्यंत एसपी, एएसपी पोलिस ठाण्यात तळ ठोकून
बीड (रिपोर्टर) : अंध आईच्या कुशीत खेळणार्या 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना रात्री बीड शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एसपी नंदकुमार ठाकुर, एएसपी सचिन पांढकर, डीवायएसपी हे रात्री 11 वाजेपासून पहाटे पावणेचार पर्यंत घटनास्थळ, जिल्हा रुग्णालय ते शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. रात्री उशिरा आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे.
एका अंध आईसोबत फिरणार्या तीन वर्षीय चिमुकलीवर रात्री बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्काऊट भवनच्या बाजुला अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चिमुकलीला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मिळताच घटनास्थळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, डीवायएसपी, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतीश वाघ आणि त्यांच्या टीमने धाव घेतली. रात्री उशीरा अल्पवयीन नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री पावणे चार वाजेपर्यंत एसपींसह सर्वच वरिष्ठ अधिकारी बीड शहर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. या प्रकरणी रात्री उशीरा आरोपीविरोधात कलम 376, पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी जिल्हा रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.